सलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...

आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय. 

Updated: Dec 23, 2016, 05:22 PM IST
सलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...  title=

मुंबई : आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय. 

आमिरचा दंगल आपल्या कुटुंबीयांसोबत पाहिल्यानंतर सलमाननं ट्विटरवर 'माझ्या कुटुंबानं दंगल पाहिला... आणि त्यांना वाटतंय की हा सुल्तानपेक्षाही चांगला सिनेमा आहे. आमिर मी वैयक्तिकरित्या तुझ्यावर प्रेम करतो... पण व्यावसायिकरित्या मात्र मी तुझा तिरस्कार करतो' अशी प्रतिक्रिया सलमाननं नोंदविली होती. 

सलमानच्या ट्विटवर आमिरनं 'सलमान खान तुझ्या तिरस्कारातही मला केवळ प्रेम जाणवतं... मी तुझ्यावर त्याच पद्धतीनं प्रेम करतो ज्या पद्धतीनं तुझा तिरस्कार करतो' असं म्हणत प्रतिक्रिया नोंदविली. 

सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा यावर्षी प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यानं हरियाणाच्या पहेलवानाची भूमिका पार पाडली होती. तर नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' हा कुस्तीचा राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे.