विराट सारखा 'चिकना छोरा' नाही : सलमान खान

 बॉलीवूडचा दबंग खान आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. सलमान मीडियासमोर ज्या प्रमाणे आपले म्हणणे मांडतो. ते अनेकांना खूप पसंत पडते. 

Updated: Feb 23, 2015, 09:15 AM IST
विराट सारखा 'चिकना छोरा' नाही : सलमान खान  title=

मुंबई :  बॉलीवूडचा दबंग खान आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. सलमान मीडियासमोर ज्या प्रमाणे आपले म्हणणे मांडतो. ते अनेकांना खूप पसंत पडते. 

असे काहीसे त्याने टीम इंडियाचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीबद्दल म्हटले आहे. सलमानने विराटला 'चिकना छोरा' म्हटले आहे. ऐवढेच नाही तर सलमान म्हटला की तो विराट इतका चिकना नाही.  "विराट मेट्रोसेक्शुअल आहे पण मी नाही," असं त्याने म्हटलं.

सलमान हे सर्व दुबईतील एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटन सोहळ्यात म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला नाही वाटत की मी विराट कोहली सारखा आहे. मी त्याच्या इतका चिकना नाही. 

त्याच्या लग्नाबद्दल पत्रकारांनी विचारले असता तो म्हणाला असे अनेक वेळा झाले आहे की मी लग्न करता करता राहून गेलो. मला वाटते ईश्वर माझ्यावर काही जास्तच मेहरबान आहे. माझ्या वक्तव्याचा अर्थ लग्न झालेल्या व्यक्तींना विचारू शकतात. 

एके दिवशी भाग्य दगा देईल आमि मला वाटते लवकरच तो दिवस येणार आहे. लग्नापेक्षा मला मुलं अधिक पसंत आहे, पण लग्नाशिवाय मुलं शक्य नाही. त्यामुळे लग्न करावेच लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.