व्हिडिओ: सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चं मेकिंग

सलमान खानचा आगामी चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर चांगलाच हिट ठरलाय आणि त्यानंतर आलेलं 'सेल्फी ले ले रे' हे गाणंही चांगलंच गाजतंय. 

Updated: Jun 9, 2015, 04:03 PM IST
व्हिडिओ: सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चं मेकिंग title=

मुंबई: सलमान खानचा आगामी चित्रपट 'बजरंगी भाईजान'ची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर चांगलाच हिट ठरलाय आणि त्यानंतर आलेलं 'सेल्फी ले ले रे' हे गाणंही चांगलंच गाजतंय. 

आता ट्रेलरच्या मेकिंगचा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. जवळपास दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या शूटिंगचे सीन दाखविण्यात आलेय. 

व्हिडिओत सलमान करीनाला सायकलवरून फिरवतांना दिसतो. तर एका सीनमध्ये दिग्दर्शक कबीर खान चित्रपटात काम केलेल्या लहान मुलीला सीन समजावतांना दिसतायेत. 

पाहा हा मेकिंगचा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.