सलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.

Updated: Nov 19, 2014, 08:41 AM IST
सलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध! title=

हैदराबाद: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.

या विवाह सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. सलमान शिवाय भाऊ सोहेल, अरबाज, वडील सलीम खान आणि सर्व नातेवाईक हजर होते. तसंच बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनीही लग्नसमारंभाला हजेरी लावली. 

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान लग्नाला उपस्थित होता. आमिर पगडी घालून इथं दिसला. शिवाय करण जोहर आणि सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ सुद्धा लग्नाला उपस्थित होती. कबीर खान, मिनी, प्रियंका चोप्रा, वरूण धवनसह अनेक बॉलिवूडचे तारे लग्नात सहभागी झाले.  

लग्नाच्यावेळी सलमान खान स्टेजवर उपस्थित होता आणि वर-वधूंना त्यानं आशीर्वादही दिले. यावेळी अर्पिताची आई हेलन, सलमानसह संपूर्ण कुटुंब भाऊक झालेलं दिसलं. 

लाल साडीमध्ये नवरी अर्पिता सुंदर दिसत होती आणि बहिणीचा लाडका भाऊ सलमाननं निळी वेलवेटची शेरवानी घातली होती. आयुष शर्मा हा माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांचा नातू आहे. 

वरात हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचले. वरातीत दोन बँड होते, एक दिल्लीचा आणि एक हैदराबादचा. त्यानंतर जयमाला आणि फेरे झाले. 

जेव्हा गोष्ट सुपरस्टार सलमानच्या घरच्या लग्नाची आहे तर संगीत, नृत्य तर असणारच.. लग्नात गायक मिका सिंह आणि हनी सिंह पण होते. त्यांच्या गाण्यावर सर्वच जणं थिरकले. मात्र सर्वांचं लक्ष सलमानची आई हेलनच्या नृत्यावर होतं.  

अर्पिता खान आता अर्पिता खान शर्मा झालीय, हे लग्न पंजाबी आणि हिंदू रितीप्रमाणं झालं. लग्नाचं रिसेप्शन २१ नोव्हेंबरला मुंबईत आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.