'प्रेम रतन धन पायो'चा विक्रम मोडण्यात 'सुल्तान' अपयशी

दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुल्तान' अखेर बुधवारी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला. देशभरातील ४८०० स्क्रीन्सवर हा चित्रपट पहिल्या दिवशी झळकला.

Updated: Jul 7, 2016, 02:45 PM IST
'प्रेम रतन धन पायो'चा विक्रम मोडण्यात 'सुल्तान' अपयशी title=

मुंबई : दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुल्तान' अखेर बुधवारी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला. देशभरातील ४८०० स्क्रीन्सवर हा चित्रपट पहिल्या दिवशी झळकला.

'सुल्तान'ने पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केलीय. म्हणजेच सलमानचा 'सुल्तान' त्याच्याच 'प्रेम रतन धन पायो'चा पहिल्या दिवशीचा विक्रमही मोडू शकलेला नाही.

'प्रेम रतन धन पायो'ने पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई केली होती. मात्र काही बॉलीवूड तज्ञांच्या मते सुल्तान ४० कोटीहून अधिक कमाई करेल असा अंदाज आहे. 

दरम्यान, 'सुल्तान'ची पहिल्या दिवसाच्या कमाईचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना याची उत्सुकता नक्कीच आहे.