तरुणींनी सलमानचं हृदय नाही... तर पाकिट आणि वस्तू लुटल्या!

अनेकाद सलमाननं तरुणींची हृदय चोरल्याचं तुम्ही ऐकलं असेल... पण, सलमानलाच तरुणींनी लुटल्याचं पहिल्यांदाच समोर येतंय.

Updated: Oct 6, 2015, 08:19 PM IST
तरुणींनी सलमानचं हृदय नाही... तर पाकिट आणि वस्तू लुटल्या! title=

मुंबई : अनेकाद सलमाननं तरुणींची हृदय चोरल्याचं तुम्ही ऐकलं असेल... पण, सलमानलाच तरुणींनी लुटल्याचं पहिल्यांदाच समोर येतंय.

होय, एका न्यूज वेबसाईटनं गेल्या आठवड्यात वांद्र्याच्या एका नाईट क्लबमध्ये गेलेल्या सलमानची भेट चार मुलींशी झाली. सलमाननं आपल्या फॅन समजून त्या मुलींशी मजा-मस्करी सुरू केली. थोड्या वेळानं या मुली तिथून गायब झाल्या...

त्यानंतर, सलमानला धक्काच बसला. कारण, एव्हाना त्याचं पाकिट, गॉगल आणि एक पेंडंट गायब झालेलं होतं. अर्थातच, मुली नंतर त्याच्या नजरेसही पडल्या नाहीत.

सलमानच्या बॉडीगार्डसनं त्याला याबद्दल तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, सलमाननं तक्रार न दाखल करण्याची भूमिका घेतली. 

दिग्दर्शक नंदितानंही या घटनेला दुजोरा दिलाय. या घटनेनंतर सलमाननं आपल्या सुरक्षेत 2 ऐवजी 14 गार्डसला आपल्यासोबत घेतलंय, असंही तिनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.