सलमान खान चक्क झाला गायक

दबंग स्टार सलमान खान आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. मला चांगलं गाता येत नाही. मात्र, मी गाण्याचा प्रयत्न केलाय, असे त्यांने म्हटलंय. सल्लूचं आगामी सिनेमा 'किक'चं तिसरे गाणं ही रिलीज झाले.

Updated: Jul 9, 2014, 02:09 PM IST
सलमान खान चक्क झाला गायक title=
फाईल फोटो

मुंबई : दबंग स्टार सलमान खान आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. मला चांगलं गाता येत नाही. मात्र, मी गाण्याचा प्रयत्न केलाय, असे त्यांने म्हटलंय. सल्लूचं आगामी सिनेमा 'किक'चं तिसरे गाणं ही रिलीज झाले.

खास गोष्ट म्हणजे हे गाणे स्वतः सलमाने गायले आहे. 'तू ही तू' हे गाणे सलमाने गायल असून त्याला हिमेश रेशमियाने संगीत दिले आहे. 
यापूर्वी रिलीज झालेलं 'हॅंगओव्हर' गाणे ही सलमानने गायले होते आणि हिमेश रेशमियाने संगीत दिले होते.

सलमान खानचा 'किक' हा सिनेमा २५ जुलै ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. किकमध्ये सलमानसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये सलमानसाठी ही पहिलीच संधी असेल की ज्यात सलमानने फक्त भूमिकाच नाहीतर दोन दोन गाणी गायली आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.