'साराभाई' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

सगळ्यांची लाडकी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे.

Updated: Apr 5, 2017, 10:57 AM IST
'साराभाई' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! title=

मुंबई : सगळ्यांची लाडकी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे.

मे महिन्यापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. पण आता ही मालिका 'वेब सीरिज'च्या माध्यमातून सुरु होणार आहे. 

मालिकेच्या शूटलाही सुरुवात झालीय. निर्माता - दिग्दर्शक जमनदास मजेठिया यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साराभाई कुटुंबातील विविधांगी व्यक्तिरेखा आणि त्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची पुन्हा ओळख करुन दिली.