अक्षय कुमार, डिंपल कपाडिया यांना सर्वोच्च न्यायलयाची नोटीस

बॉलिवूड  अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती. 

PTI | Updated: Aug 7, 2015, 08:49 PM IST
अक्षय कुमार, डिंपल कपाडिया यांना सर्वोच्च न्यायलयाची नोटीस  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड  अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती. 

अनिता यांनी डिंपल कपाडिया, अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार केल्याचा  आरोप करुनय याबाबत एक याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर अनिता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने अक्षय आणि डिंपल यांना नोटीस पाठविली .

२०१३ साली अडवाणी यांनी डिंपल, अक्षय कुमार, टि्वंकल आणि रिंकी अशा चौघांविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. तसेच राजेश खन्ना यांच्या मालमत्तेवरील काही भागावर हक्क सांगत दर महिन्याला देखभाल खर्च आणि वांद्रे येथे तीन खोल्यांचे घर देण्याची मागणी केली होती. ही मागणी फेटाळण्यात आली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.