'शमिताभ' चा दुसरा ट्रेलर लॉन्च..

  'शमिताभ' या महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगऴवारी मायानगरी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमधे लॉन्च करण्यात आला. निमित्त ठरले ते, उपस्थित सुपरस्टार रजनिकांत, कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांचे.

Updated: Jan 21, 2015, 10:12 AM IST
'शमिताभ' चा दुसरा ट्रेलर लॉन्च.. title=

मुंबई :  'शमिताभ' या महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचा दुसरा ट्रेलर मंगऴवारी मायानगरी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमधे लॉन्च करण्यात आला. निमित्त ठरले ते, उपस्थित सुपरस्टार रजनिकांत, कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांचे.

दुसऱ्या ट्रेलरमध्ये पहिल्या ट्रेलरपेक्षा सिनेमाचा लूक जास्त उलगडला आहे. यामध्ये धनुष अमिताभ बच्चनच्या आवाजाची नक्कल करताना दिसणार आहे, त्याचवेऴी या सिनेमात काम करणारी कमल हसन यांची मुलगी आणि अभिनेत्री अक्षरा अमिताभला विचारते. यावेळी अमिताभ आपल्या भारदार आवाजात बोलतात, 'यह आवाज एक कुत्ते के मुंह से भी अच्छी लगेगी.'

तसं बघायला गेलं तर चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधूनही चित्रपटाच्या स्टोरीचा अंदाज येत नाही. पण या चित्रपटात धनुष एका नायकाची भूमिका करत असून तो अमिताभचा आवाज आणि त्यांचा अंदाज यांची नक्कल करणार आहे. तर कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहे.

'शमिताभ' या चित्रपटाचे दिग्दर्शन 'चीनी कम' आणि 'पा' या सिनेमांचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केले आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.