मुंबई : मराठीत रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या लय भारी या सिनेमाचा आता लवकरच सिक्वल पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला हा सिनेमा खुपच आवडला होता. लवकरच या सिनेमाचा सिक्वल येणार असल्याचं करण जोहरने ट्विट केलंय. एव्हढंच नाही तर त्याने या सिनेमाचं पोस्टरही ट्विटरवर पोस्ट केलंय.
After the blockbuster #Laibhaari @Riteishd 's next Marathi film will be on the floors soon!!! It's going to be huge! pic.twitter.com/y064w5LjDz
— Karan Johar (@karanjohar) April 13, 2015
निशिकांत कामत दिग्दर्शित आणि जेनिलिया देशमुख निर्मित या सिनेमाचं नाव 'माऊली' असं असेल.
हा सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समजतंय. 'लय भारी' हा रितेशचा पहिला मराठी सिनेमा होता. याशिवाय बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि जेनिलियाचा यांचा स्पेशल अपिअरन्स असल्याने मराठी प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला होता.
त्यामुळे आता लय भारीचा सिक्वेल असणाऱ्या माऊली सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता पाहायला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.