अखेर, शाहिद - मीरा विवाहबंधनात अडकले

बॉलीवुडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा पार पडलाय.   

Updated: Jul 7, 2015, 05:15 PM IST
अखेर, शाहिद - मीरा विवाहबंधनात अडकले title=

नवी दिल्ली : बॉलीवुडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा पार पडलाय.   

शाहिद आणि मीरा आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी अवघ्या आपल्या जवळच्या ४०-५० नातेवाईकांच्या साक्षीनं विवाहबंधनात अडकले.  

यापूर्वी शाहीद आणि मिराचा संगीत सेरेमनीही पार पडला. दोन्ही कुटुंबांनी सोमवारी रात्री एका भव्य संगीत समारंभाचे आयोजन केले होते. इंटरनेटवर ह्या समारंभाचा एक फोटो आता वायरल झालाय. यामध्ये शाहीद आणि मीरा एकमेकांचे हातात हात घेताना दिसत आहेत.   

पंकज कपूर, सुप्रिया पाठक आणि नीलिमा अजीम असे शाहिदच्या कुटूंबातील सगळे या समारंभासाठी उपस्थित होते आणि उत्साहितही दिसत होते. वर्षाच्या सुरुवातीलाच ३४ वर्षीय शाहिद ह्याचा साखरपूडा २१ वर्षीय मीरा हिच्याशी झाला होता.  शाहिद आणि मीरा हे ‘राधास्वामी सत्संग व्यास’ ह्या धार्मिक संस्थेत भेटले होते. दोघांचंही कुटूंब या संस्थेचे अनुयायी आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.