व्हिडिओ : शर्टाशिवाय शाहरुख देतोय महिलांचा सन्मान करण्याचा संदेश

बॉलिवूडचा 'किंग खान' ट्विटरवरही किंग ठरला आहे. कारण त्याची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १.३ कोटीवर पोहचलीय. आपल्या सर्व फॅन्सचे शाखरुखनं यानिमित्तानं आभार मानलेत. पण अनोख्या पद्धतीनं...

Updated: May 16, 2015, 01:14 PM IST
व्हिडिओ : शर्टाशिवाय शाहरुख देतोय महिलांचा सन्मान करण्याचा संदेश title=

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' ट्विटरवरही किंग ठरला आहे. कारण त्याची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १.३ कोटीवर पोहचलीय. आपल्या सर्व फॅन्सचे शाखरुखनं यानिमित्तानं आभार मानलेत. पण अनोख्या पद्धतीनं...

शाहरुखने त्याच्या ट्विटरवरील सर्व फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. त्याने आभार व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्या व्हिडिओत शाहरुख शर्टाशिवाय दिसतोय.... आणि या व्हिडिओत तो महिलांचा सन्मान करण्याचा संदेश देतोय.

'एक घर, एक कुटुंब वेगवेगळ्या लोकांचं मिळून बनतं. आपण एकमेकांशी चर्चा करतो, एकमेकांशी भांडतो. मात्र आई, पत्नी, बहीन, मुली यांना शिव्या देत नाही. माझ्यासोबत या घराला सुंदर बनवल्याबद्दल १.३ कोटी लोकांचे आभार. धन्यवाद' असं या व्हिडिओत शाहरुख म्हणताना दिसतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.