श्रद्धाच्या प्रेमात वडील शक्ती कपूर व्हिलन?

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.

Updated: Dec 29, 2016, 05:02 PM IST
श्रद्धाच्या प्रेमात वडील शक्ती कपूर व्हिलन? title=

मुंबई : फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. एवढच काय तर श्रद्धा कपूर ही फरहानच्या घरी राहायला गेली होती. यावेळी तिचे वडिल शक्ती कपूर फरहानच्या घरी जाऊन श्रद्धाचा हात पकडून तिला घेऊन आल्याचंही बोललं गेलं.

शक्ती कपूरनं मात्र या सगळ्या बातम्या फेटाळल्या आहेत. यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मागच्या 35 वर्षांपासून मी बॉलीवूडमध्ये आहे. अशा अनेक बातम्या प्रसिद्ध होतात पण त्यावर प्रतिक्रिया द्यायची मला गरज नसल्याचं शक्ती कपूर म्हणाला आहे.