मुबंई : २०१५ या वर्षाच्या सुरुवातीलाच खान आणि खेमू परिवार एकत्र येणार आहे. वर्षाभरापासून अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मैत्री आहे. या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबधात झाले. या दोघांनीही आपले नाते आणखी पुढे नेऊन लग्न करण्याच निर्णय घेतला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कुणाल-सोहा यांचा २५ जानेवारी रोजी विवाह होणार आहे. हा विवाहसोहळा अतिशय साध्या पद्धतीत करण्याचा त्यांचा मानस आहे.
केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. सैफ अली खानने करीना कपूरशी निकाह केल्यानंतर लगेचच सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या लग्नाचीही चर्चा होती.
बॉलिवूडमधील अनेक कलावंतांच्या विवाहाची चर्चा अधूनमधून होतच असते. परंतु, सोहा अली खानची आई शर्मिला टागोरने खारच्या उच्चभ्रू परिसरात ९ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी करून कन्या सोहाला भेट दिले. यामुळे सोहा-कुणालच्या लग्नाची चर्चा अधिकच रंगली. आता त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.