मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमनं आज सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलंय.
लाऊडस्पीकरमधून अजानचा विरोध करून हेडलाईन्समध्ये आलेला गायक सोनू निगम आता गायक अभिजीतच्या समर्थनार्थ पुढे आलाय. ट्विटर यूझर्सनं तक्रार केल्यानंतर नुकतंच अभिजीतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलंय. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं ही कारवाई केलीय. त्याचाच विरोध करत सोनूनं अभिजीतला पाठिंबा दर्शवलाय.
'मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतलाय. माझे जवळपास ७० लाख फॉलोअर्स यामुळे निराश होतील आणि माझ्यावर रागावतीलदेखील... परंतु, काही लोक यामुळे आनंदितही होतील' असं म्हणत सोनूनं आणखी काही ट्विट केलेत.
Sonu Nigam in a series of tweets says, he will be leaving Twitter soon. pic.twitter.com/2X8I7N61JY
— ANI (@ANI_news) May 24, 2017
'अशा परिस्थितीत अभिजीतहून घाणेरड्या शिव्या, धमक्या आणि कट्टरतावाद पसरवणारे ९० टक्के ट्विटर अकाऊंट बंद व्हायला हवेत' असंही एका ट्विटमध्ये सोनूनं म्हटलंय.