चेन्नई : यंदाचे वर्ष सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे संसार यावर्षात मोडल्याचे पाहायला मिळालं. यामध्ये आता दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीचाही यात समावेश झाला आहे.
रजनीकांत यांची दुसरी मुलगी सौंदर्या हिने कौटुंबिक फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. कोच्चडियन चित्रपटाचं दिग्दर्शन केलेली सौंदर्या ही फिल्ममेकर आणि ग्राफिक डिझाईनर आहे. सौंदर्यानं बिझमन पती अश्विन रामकुमार याच्यासोबत 2010 मध्ये लग्न केलं होतं. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दीड वर्षांचा मुलगा आहे.