किरण कुलकर्णी म्हणतायत, आत्ता खुश्शाल होऊ दे खर्च

अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सलमान खान यांच्यानंतर आता मराठीतही अभिनेता-अभिनेत्री गायकाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळतायत.

Updated: May 21, 2016, 03:33 PM IST
किरण कुलकर्णी म्हणतायत, आत्ता खुश्शाल होऊ दे खर्च title=

मुंबई : अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सलमान खान यांच्यानंतर आता मराठीतही अभिनेता-अभिनेत्री गायकाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळतायत.

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर लवकरच किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या सिनेमातून आपल्यासमोर येतायत. सांगायचं म्हणजे, या सिनेमाचं 'आता होऊ दे खुश्शाल खर्च' हे प्रमोशनल साँग या दोघांनीच गायलंय. त्यामुळे आता त्यांचं सिंगिंग टॅलेंटही प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

'आता होऊ दे खुश्शाल खर्च' हे गाणं मंदार चोळकर यांनी लिहिलंय. तर वैशाली सामंत यांनी या गाण्याला संगीत दिलंय. 

कांचन अधिकारी दिग्दर्शित 'किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी" हा सिनेमा येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर, उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका पाहायला मिळतील.