सुल्तान - फॅमिली एंटरटेनर सिनेमा

बॉलिवूड दबंग खानचा मच अवेटेड सुल्तान हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक अली अब्बास जफऱ यांनी. या आधीही ईदच्या मुहूर्तावर सलमानचे अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. 

Updated: Jul 6, 2016, 02:38 PM IST
सुल्तान - फॅमिली एंटरटेनर सिनेमा title=

मुबई : बॉलिवूड दबंग खानचा मच अवेटेड सुल्तान हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक अली अब्बास जफऱ यांनी. या आधीही ईदच्या मुहूर्तावर सलमानचे अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. 

वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, किक, बजरंगी भाईजाननंतर सुल्तान हा सिनेमाही ईदच्याच मुहूर्तावर प्रदर्शित झालाय. कसा आहे सुलतान, काय आहे सुलतानची ट्रू स्टोरी, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का..त्यासाठी या सिनेमावर एक नजर टाकूया.

सिनेमाची कथा

हरियाणात राहणा-या सुल्तान अली खान या आपल्याच दुनियेत मस्त असणा-या, हॅप्पी गो लकी अशा तरुणाची ही गोष्ट आहे. अचानक एक दिवस त्याच्या आयुष्यात आरफाची एंट्री होते. आऱफा एक राज्य पातळीवरील कुस्तीपटू आहे. तिला कुस्तीमध्ये मोठं करियर करायचंय. म्हणून तिला प्यार व्यारमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आरफानं केलेल्या रिजेक्शनमुळे सु्ल्तानच्या जीवनात खूप मोठा बदल घडतो. त्याला आपली हरवलेली वाट पुन्हा सापडते.. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा सुल्तान हा सिनेमा आहे.

चित्रपटाची ताकद

सुल्तान हा टिपीकल सलमान खान कमर्शियल मसाला सिनेमा आहे. सिनेमाचा पूर्वार्ध खूपच मजेशीर आणि एंटरटेनिंग झालाय. मात्र सिनेमाचा उत्तरार्ध थोडासा स्लो जाणवतो. सिनेमाचा स्पीड हरवतो. मात्र बिग स्क्रीनवरच्या सलमान खानच्या सततच्या वावरमुळे सिनेमा तुम्हाला एंटरटेन करत राहतो.

सिनेमाची सिनेमाटॉग्राफी, डायलॉग्स, फाईट सिक्वेन्स सगळेच कमाल झालेत. सुलतानमधली सलमानची संपूर्ण शरीरयष्टी पाहून, या सिनेमासाठी सलमाननं भरपूर कष्ट घेतलेत हे जाणवतं. खूनमे तेरी मिट्टी, मिट्टी मे तेरा खून, उपर अल्ला निचे धरती बीचमे तेरा जुनून... हे सिनेमाचं थीम सॉन्ग सिनेमाच्या फ्लोला कायम ठेवण्यात भरपूर मदत करतो.

खटकणारी गोष्ट

सिनेमात जी गोष्ट खटकते ती म्हणजे सिनेमाचं ओवरऑल DURATION. सिनेमाला आणखी क्रिस्प करता आलं असतं, तर कदाचित सिनेमा आणखी रंजक झाला असता.

सिनेमाचं संगीत ही अप्रतिम झालंय. विशाल शेखर या संगीतकार जोडीनं सिनेमाच्या फ्लेवर प्रमाणेच सिनेमाला संगीत दिलंय. 

सुल्तान म्हणजे सलमान

हा सिनेमा एक कंप्लिट फॅमिली एंटरटेनर आहे, सिनेमात ड्रामा आहे,  गाणी आहेत, एंटरटेन्मेन्ट आहे.. विशेष करुन सुल्तान या संपूर्ण सिनेमात एक गोष्ट अशी आहे जी तुमचं पुरेपुर मनोरंजन करेल, ती म्हणजे.. सलमान खान, सलमान खान... आणि सलमान खान. 

किती स्टार्स 

या सिनेमाला मिळतायत ३.५ स्टार्स