'सुल्तान'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करतोय.

Updated: Jul 10, 2016, 02:22 PM IST
'सुल्तान'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई title=

मुंबई : ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करतोय.

या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच तब्बल १०० कोटींचा आकडा पार केला. शनिवारच्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ३७.१० कोटींची कमाई केली. 

यासोबतच या चित्रपटाने ४ दिवसांत सुमारे १४२.६२ कोटी कमावलेत. आजचा वार सुट्टीचा वार असल्याने आजच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, 'सुल्तान' ऑनलाईन लीक झाल्यानंतरही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट लीक झाला होता. मात्र त्यानंतरही बॉक्स ऑफिसवर सुल्तान कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय.