कपिलच्या शोमध्ये शक्ती कपूरची उडवली खिल्ली, श्रद्धा कपूर नाराज

 कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील भांडण शांत व्हायला एक महिना लागला, त्यानंतर सर्व काही शांत होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो वादात आला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 17, 2017, 06:33 PM IST
कपिलच्या शोमध्ये शक्ती कपूरची उडवली खिल्ली, श्रद्धा कपूर नाराज  title=

मुंबई :  कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील भांडण शांत व्हायला एक महिना लागला, त्यानंतर सर्व काही शांत होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो वादात आला आहे. 

या शोमध्ये हाफ गर्लफ्रेंडच्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर आले होते. या शोमध्ये चेतन भगतही उपस्थित होता. या भागात सर्व काही चांगले सुरू होते, कपिलच्या जोक्सवर सर्व मनसोक्त हसत होते.  तेव्हा सुमोना चक्रवर्ती म्हणजे सरलाची एन्ट्री झाली. 

सुमोनाने श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांची जुनी इमेजची आठवण करून दिली. पण हा जोक श्रद्धाला बिल्कुल आवडला नाही. सर्व जोक्सवर हसत होते, पण श्रद्धा सुमोनाकडे नजर रोखून बघत होती. हे पाहून सुमोनाने आपले म्हणणे बदलले. 

सुमोना चित्रपटाच्या स्टार कास्टकडून कपिलला रोमान्स शिकविण्यासाठी टिप्स घेत होती. यात कपिलने मस्करीत विचारले, की कशा प्रकारचा बॉयफ्रेंड बनायला पाहिजे किंवा नाही, त्यावर सुमोनाने शक्ती कपूर यांचे नाव घेतले. त्यावर श्रद्धाच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला.