ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज

सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.

Updated: Nov 8, 2015, 07:50 PM IST
ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज title=

मुंबई: सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.

१६ जानेवारी २०१६ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं आपला आगामी चित्रपट 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज केलंय. हा चित्रपट १९९०मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट घायलचा सिक्वेल आहे.

फोटोमध्ये चार मुलं देओलचा हात पकडून आहेत. देओलनं ट्विटरवर पोस्ट केलंय, 'चार निष्पाप मुलं.. देशातील सर्वात ताकतवर व्यक्ती विरोधात. त्यांच्यासोबत फक्त एकच व्यक्ती उभा आहे. घायल वन्स अगेन.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.