सनी म्हणतेय, तिकीट घ्या तिकीट

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हल्ली स्टार्स अनोखे फंडे वापरतात. असंच काहीसं वेगळ सनी लिओनही तिच्या मस्तीजादे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करतेय. 

Updated: Jan 28, 2016, 04:00 PM IST
सनी म्हणतेय, तिकीट घ्या तिकीट title=

मुंबई : चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हल्ली स्टार्स अनोखे फंडे वापरतात. असंच काहीसं वेगळ सनी लिओनही तिच्या मस्तीजादे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करतेय. 

सनी लिओनचा मस्तीजादे हा चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होतोय. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सनी गुरुवारी मुंबई उपनगरात स्वत: तिकीटांची विक्री करणार आहे. वर्सोवाच्या पीव्हीआर आणि वांद्रेच्या गेटी गॅलॅक्सीमध्ये तिकीटांची विक्री करेल. 

या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पहिला दिवस आणि वीकेंड महत्त्वाचा असणार आहे. यासाठी चित्रपटाचे निर्माता, संपूर्ण स्टारकास्ट जोरदार प्रमोशन करतायत. मस्तीजादे या चित्रपटात डबल रोलमध्ये आहे. त्यांच्यासोबत तुषार कपूर आणि वीरदास मुख्य भूमिकेत आहेत.