मुंबई: सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.
खूप काळापासून सुझान आणि अर्जुन रामपालच्या अफेअरची चर्चा होती. अर्जुनमुळेच हृतिक-सुझानचा घटस्फोट झाल्याचंही बोललं जायचं. लग्नाच्या 13 वर्षानंतर या जोडीनं 2014मध्ये घटस्फोट घेतला.
आणखी वाचा - सुझानच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुनची प्रतिक्रिया...
हृतिक आणि सुझानला दोन मुलं आहेत. एक सात वर्षांचा आणि दुसरा मुलगा पाच वर्षांचा आहे. अर्जुन रामपाल आणि सुझानला एका कॉफी शॉपमध्ये रंगेहाथ पकडलं होतं, अशा बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यावर सुझाननं या अफवा असल्याचं म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी सुझानच्या आईनंही तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दलची बातमी नाकारली होती.
आणखी वाचा - आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.