श्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. 

PTI | Updated: Nov 11, 2014, 02:40 PM IST
श्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये title=

कोलकाता: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. 

बेले वुई क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टंडन यांनी सांगितलं की, 70 वर्षीय अभिनेत्री तनुजा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं ऑक्सिजन लावलं गेलंय.  

टंडन यांनी सांगितलं, "आता त्यांची परिस्थिती सामान्य आहे." तनुजा कोलकाताला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या रात्रीच्या जेवणाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तिथं त्यांची तब्येत बिघडली. या समारंभात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पण सहभागी होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.