मुंबई : गेल्या ८ एप्रिल रोजी रिलिज झालेल्या जंगल बूक या चित्रपटाने १० दिवसात जगभरात एक नाही, दीड नाही तर तब्बल दोन हजार कोटीपेक्षा अधिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली आहे.
हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरो दिग्दर्शित ३ डी लाइव्ह अॅनिमेटेड फिल्म 'द जंगल बूक' ने भारतात १०० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा शाहरूखच्या 'फॅन'शी टक्कर आहे.
या चित्रपटाने ११ दिवसता वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफीस मोजोने दिलेल्या माहितीनुसार जगभरात भारत सोडून 290,967,000 डॉलर म्हणजे 1936,54,39,620 रुपये कमविले आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
वर्ल्ड वाईड १९३६.५ कोटी आणि भारतातील १०१ कोटी एकूण २०३८.कोटी रूपयांची कमाई झाली आहे. ही चित्रपट ८ एप्रिलला भारतात रिलीज झाली त्यानंतर एका आठवड्यानंतर अमेरिकेत रिलीज झाली होती.