टायगरनेच सांगितलं टायगर नावामागचं गुपित

टायगर श्रॉफ हे नाव ऐकल्यावर प्रत्येकाला या नावाबद्दल उत्सुकता निर्माण होते. कोणी आपल्या मुलाचं नाव टायगर कसं ठेवू शकतं हा प्रश्न साहजिकच पडतो. पण या शंकेचं निरसन स्वतः टायगर श्रॉफनेच केलंय.

Updated: Aug 3, 2016, 05:21 PM IST
टायगरनेच सांगितलं टायगर नावामागचं गुपित  title=

मुंबई : टायगर श्रॉफ हे नाव ऐकल्यावर प्रत्येकाला या नावाबद्दल उत्सुकता निर्माण होते. कोणी आपल्या मुलाचं नाव टायगर कसं ठेवू शकतं हा प्रश्न साहजिकच पडतो. पण या शंकेचं निरसन स्वतः टायगर श्रॉफनेच केलंय.

‘लहानपणी मला लोकांना चावायची सवय होती म्हणूनच माझं नाव टायगर ठेवण्यात आलं’ असं तो स्वतःच सांगतो. आंतरराष्ट्रीय टायगर डे निमित्त एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलंय. टायगर श्रॉफ हा प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी हिरोपंती सिनेमातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तत्पूर्वी धूम 3 सिनेमासाठी आमिर खानचा फिजिकल ट्रेनर म्हणून त्याने काम केलं होतं.

‘मी ज्या शाळेत शिकलो तिथे माझ्याशिवाय इतर कोणीही टायगर नव्हता. त्यामुळे माझं नाव सगळ्यांना आवडायचं’ असं टायगर म्हणतो. गोल्फर टायगर वूड्स आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्याप्रमाणेच यशस्वी वाटचाल करण्याची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं.