तुषार कपूर लग्नाआधीच बनला बाबा

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरबाबतची आश्चर्यजनक बातमी समोर आलीये. सरोगसीच्या सहाय्याने तुषार एका मुलाचा पिता बनलाय. 

Updated: Jun 27, 2016, 02:08 PM IST
तुषार कपूर लग्नाआधीच बनला बाबा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरबाबतची आश्चर्यजनक बातमी समोर आलीये. सरोगसीच्या सहाय्याने तुषार एका मुलाचा पिता बनलाय. तुषारने आपल्या मुलाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत सिंगल असलेला तुषार खऱ्या आयुष्यातील बापाच्या भूमिकेसाठी खूपच एक्सायटेड आहे. 

बाबा झाल्याचा आनंद माझ्यासाठी मोठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा अखेर पूर्ण झाली. जीवनातील सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट मला मिळाली आहे. देवाच्या कृपेने आणि जसलोकमधील मेडीकल टीमच्या प्रयत्नांमुळेच ही गोष्ट शक्य झाल्याचे तुषारने सांगितले. 

याआधी आमिर खानही सरोगेट मदरच्या सहय्याने पिता बनला आहे. आजाद असे आमिरच्या या मुलाचे नाव आहे.