न्यूयॉर्क - अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो 'टू अँड ए हाफ मॅन' मधील प्रसिद्ध अभिनेता चार्ली शीनने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खुलासा केलाय.
चार वर्षापूर्वीच एड्स झाल्याचे समजले होते असे शीनने म्हटले आहे. ज्यांना शीनच्या आजाराबद्दल माहिती आहे त्या लोकांनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर शीनने ही माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला.
ज्यांना माझ्या या आजाराबद्दल माहिती आहे त्यांनी ती लपवावी यासाठी मी खूप पैसे दिल्याचे चार्ली शीन म्हणाला. एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमादरम्यान आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्याची आधीची पत्नी डेनिस रिचड्रर्स आणि त्याच्या दोनही मुली सुरक्षित असून त्यांना कोणताही संसर्ग न झाल्याचे शीनने यावेळी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.