अंकिता लोखंडे हॉस्पीटलमध्ये दाखल

झी टीव्हीवरच्या ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Updated: Sep 4, 2014, 09:12 AM IST
अंकिता लोखंडे हॉस्पीटलमध्ये दाखल title=

मुंबई : झी टीव्हीवरच्या ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

अचानक, अंकिता हिच्या पोटात दुखू लागल्या तिला तत्काळ अंधेरीच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार, अंकिताला अपेंडिक्सचा त्रास जाणवत आहे. सध्या तिच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी अंकिताला 10 दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.