उडता पंजाब सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात

उडता पंजाब या सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. 

Updated: Jun 8, 2016, 05:04 PM IST
उडता पंजाब सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात title=

मुंबई : उडता पंजाब या सिनेमावरुन सुरु असलेला वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाजल निहलानी यांनी अखेर याबाबतीत मौन सोडलेय.

उडता पंजाबच्या निर्मात्यांना कोर्टात जाण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं निहलानी म्हटले आहे. तसेच अनुराग कश्यपचा हा पब्लिसीटी स्टंट असल्याचं सांगून सिनेमातून पंजाब नाव वगळण्याचं सेन्सॉरने सांगितले नसल्याचे निहलानी यांनी स्पष्ट केलं आहे.

१७ जूनला प्रदर्शित होणारा शाहिद कपूर आणि करिना कपूर स्टारर उडता पंजाब वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे..या सिनेमावर सेन्सॉरची गदा पडली असून तब्बल ८९ कट्स या सिनेमात सांगितले आहे. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी नाराजी दर्शविली आहे.

उडता पंजाब सिनेमावरुन वाद आता शिगेला पोहोचला आहे. या सिनेमाचा निर्माता अनुराग कश्यपने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींना तानाशाह म्हंटलं आहे. मला तर वाटतं की निहलानी उत्तर कोरियामध्ये राहतात असंही अनुरागने म्हंटलं आहे. सिनेमातून पंजाबचं नाव वगळावं तसेच पंजाबचा बॅकड्रॉप काढावा, अशी सूचना सेन्सॉर बॉर्डानं केली आहे. तसेच सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यही वगळण्यास सेन्सॉर बॉर्डानं सांगितले, असे त्यांनी म्हटले