लॉस एन्जिलीस : शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे भारतीय राजदूत रिचर्ड वर्मा आणि अमेरिकेच्या दक्षिण मध्य आशियाच्या उपसचिव निशा बिसवाल यांनी ट्विटरवरून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
या घटनेबद्दल आम्ही माफी मागतो, असा प्रकार पुन्हा होणार नाही. शाहरुखचं काम अनेकांप्रमाणेच अमेरिकेलाही प्रेरणा देतं, असं ट्विट रिचर्ड वर्मांनी केलं आहे. निशा बिसवाल यांनीही ट्विटकरून माफी मागितली आहे.
विमानतळावर अडवल्याप्रकरणी शाहरुखनं ट्विटरवरून संताप व्यक्त केला होता. अमेरिकन सुरक्षा यंत्राणाचा आदर करतो. पण प्रत्येक वेळी अशा प्रकारे रोखून धरणं अत्यंत मनःस्ताप देणारं असल्याचं शाहारूखनं म्हटलं होतं.