पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'!

सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

Updated: Jul 1, 2016, 06:19 PM IST
पब्लिक टॉयलेट वापरा आणि फ्रीमध्ये पाहा, रजनीचा 'कबाली'! title=

चेन्नई : सार्वजनिक टॉयलेट वापरलं तर तुम्हाला तुमचा फेव्हरेट स्टार अभिनेता रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली' मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. 

पाँडिचेरीच्या जिल्हाधिकार्यांनी साफ-सफाईला महत्त्व देण्याच्या उद्देशानं हे जाहीर आवाहन केलंय. तर रजनीकांची जादू लोकांवर चढायला सुरुवात झालेली पाहून किरण बेदी यांनी 'समृद्ध पाँडिचेरी मिशन'ची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर बनण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

किरण बेदी यांनी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांची ऑफर आणि कबाली फ्रीमध्ये पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती दिलीय. मोदी सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान' योजनेंतर्गत इथं हे मिशन राबवण्यात येतंय. 

रजनीकांतचा 'कबाली' हा एक गँगस्टर ड्रामा असलेला सिनेमा आहे. यात रजनीकांतनं एका मल्याळम गँगस्टर डॉन 'कबाली'ची भूमिका निभावलीय.