फायनली करनच्या 'शुद्धी'त वरूण - आलिया

करण जोहरच्या महत्त्वकांक्षी 'शुद्धी' या सिनेमात त्याचे 'स्टुडंट ऑफ द ईअर' मुख्य भूमिका साकरणार आहेत. 

Updated: May 23, 2015, 02:13 PM IST
फायनली करनच्या 'शुद्धी'त वरूण - आलिया title=

मुंबई : करण जोहरच्या महत्त्वकांक्षी 'शुद्धी' या सिनेमात त्याचे 'स्टुडंट ऑफ द ईअर' मुख्य भूमिका साकरणार आहेत. 

वरुण धवन आणि आलिया भट्ट या सिनेमांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी सलमान खानची निवड करण्यात आली होती. 

शुद्धीचं दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहे. मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली होती. पहिल्यांदा सिनेमात ह्रतिक रोशन आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होते. मात्र, ह्रतिकने आरोग्याच्या समस्येमुळे हा सिनेमा सोडला होता, त्यानंतर करिनालाही सिनेमा सोडावा लागला.

त्यानंतर, या सिनेमाच्या मुख्य भूमिकेसाठी सलमानचं नाव पुढे येत होतं. मात्र, सलमाननेही या सिनेमाला नकार दिला. आता खुद्द करण जोहरनं ट्विट करुन याबद्दल माहिती दिलीय. 

सलमाननेही या सिनेमासाठी वरूणला शुभेच्छा दिल्या. हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.