'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण

साईभक्त असलेल्या विरु देवगण यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. 

Updated: Oct 26, 2016, 08:35 PM IST
'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण title=
फाईल फोटो

शिर्डी : साईभक्त असलेल्या विरु देवगण यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. 

या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या आपल्या मुलाच्या म्हणजेच अजय देवगणच्या 'शिवाय' या चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी साईंना साकडं घातलं. तसंच या चित्रपटाची प्रिंट साईंच्या चरणी अर्पण केली.

'शिवाय' हा चित्रपट अजय देवगनचीच निर्मिती असून अजयनंच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलंय. येत्या 28 ऑक्टोबरला 'शिवाय' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मात्र, याच दिवशी करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल'ही प्रदर्शित होणार असल्यानं दोघांमध्ये तीव्र स्पर्धा रंगण्याची चिन्ह आहेत.