व्हिडिओ : 'मृत्यूचं सेलिब्रेशन'... अनुपमच्या डोळ्यांत पाणी

'तक्रार करणं ही जगातील सर्वांत सोपी गोष्ट आहे... पण, तक्रार करण्यासाठी आयुष्य खूप छोटं आहे' हे शब्द आहेत अभिनेता अनुपम खेर यांचे वडील पुष्करनाथ खेर (१९२८ - २०१२) यांचे... 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 13, 2015, 08:21 AM IST
व्हिडिओ : 'मृत्यूचं सेलिब्रेशन'... अनुपमच्या डोळ्यांत पाणी title=

मुंबई : 'तक्रार करणं ही जगातील सर्वांत सोपी गोष्ट आहे... पण, तक्रार करण्यासाठी आयुष्य खूप छोटं आहे' हे शब्द आहेत अभिनेता अनुपम खेर यांचे वडील पुष्करनाथ खेर (१९२८ - २०१२) यांचे... 

१० फेब्रुवारी, २०१२ रोजी पुष्करनाथ यांचं निधन झालं... त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपल्या वडिलांच्या  काही आठवणी अनुपम खेर यांनी आपल्या शब्दांत मांडल्यात एका व्हिडिओद्वारे...

'मृत्यू' हा प्रत्येक वेळीच दु:खद असतो असं नाही... तर मृत्यूचंही सेलिब्रेशन केलं जाऊ शकतं... आपल्याला आनंदात मृत्यू यावा... या विचारसरणी अनुपम खेर यांची का झाली? त्याबद्दल ते या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. 'मृत्यू हा काही जीवनाचा शेवट नसतो तर ती एक नवी सुरुवात असते' हे आपल्या वडिलांचे शब्द आजही अनुपम यांच्या कानात घोळत आहेत.... 

पाहुयात, अनुपम खेर यांनी आपल्या वडिलांच्या शेअर केलेल्या काही मनोरंजक आठवणी...

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.