VIDEO ट्रेलर : सामाजिक व्यंगावर भाष्य करतोय 'पोश्टर गर्ल'!

सामाजिक व्यंगावर आधारित असलेला सोनाली कुलकर्णी हिचा 'पोश्टर गर्ल' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Jan 21, 2016, 04:53 PM IST
VIDEO ट्रेलर : सामाजिक व्यंगावर भाष्य करतोय 'पोश्टर गर्ल'! title=

मुंबई : सामाजिक व्यंगावर आधारित असलेला सोनाली कुलकर्णी हिचा 'पोश्टर गर्ल' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 
 
'संपूर्ण गावासाठी येकच बस' ही 'पोश्टर गर्ल'ची टॅग लाईन महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींच्या घटणाऱ्या संख्येवर व्यंगात्मक पद्दतीनं भाष्य करतेय. 

सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन असे स्टार कलाकार या चित्रपटात दिसतायत. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राजचे आहे. हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.