प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 4, 2017, 06:47 PM IST
प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

पण झी २४ तासने या फोटोचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा फोटो जुना असून फोटो खालील ओळी संपूर्णपणे खोट्या आहेत. 

काय आहे फोटो ओळी....

बाहुबली सुपरस्टार प्रभासनेने आपल्या पहिल्या दिवसाची कमाई १२०कोटी रुपये नक्सलवादी कार्यवाहित शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाना देऊ केले एक सॅल्यूट या वाघासाठी
 

फोटोचे सत्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार प्रभास यांचा फोटो दोन वर्षांपूर्वीचा आहे. बाहुबली १ चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर प्रभास याने पंतप्रधानांची भेट घेतली होती. २६ जुलै २०१५ रोजी प्रभासने पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. 

या भेटीचा हा व्हिडिओ... 

 

या भेटीवेळी प्रभास याने काळा शर्ट घातला होता. तसेच मोदी यांनी मोदी कुर्ता घातला होता. तसाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

शहीद जवानांना मदत... 

प्रभास याने नक्षलवादी हल्ल्यातील जवानांनी बाहुबलीची पहिली कमाई दिली. ही गोष्ट संपूर्णपणे खोटी आहे. प्रभास अशा प्रकारे पैसे देऊ शकत नाही.  हा पैसा प्रॉड्युसरचा असतो. त्यामुळे द्यायचा असेल तर प्रो़ड्युसर म्हणजे धर्मा प्रॉडक्शनचा करण जोहर असा निधी जाहीर करू शकतो. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारची रक्कम प्रभासने दिली नाही, हे उघड झाले आहे. 

 

प्रभासला मानधन 

प्रभासला बाहुबली या चित्रपटासाठी मानधन म्हणून फक्त २५ कोटी रुपये मिळाले आहे. त्यामुळे तो १२० कोटी रुपये कसे देणार हा कॉमन सेन्स आहे. त्यामुळे अशी कोणतीही पोस्ट लोक टाकतात आणि ती व्हायरल होते. त्यामागील सत्य न पडताळता आपण ती फॉरवर्ड होते