एअरपोर्टवर एकत्र दिसले विराट-अनुष्का

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपबाबत त्यांच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगलीये. 

Updated: Jun 3, 2016, 12:53 PM IST
एअरपोर्टवर एकत्र दिसले विराट-अनुष्का title=

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपबाबत त्यांच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगलीये. 

काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा हे दोघं एकत्र आलेत. नुकतंच हे कपल मुंबई एअरपोर्टवर एकत्र दिसले. 

अनुष्का सुल्तानच्या शूटिंगसाठी रवाना होत असताना विराट तिला पोहोचवण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर आला होता. यावेळी विराटने अनुष्काला किस तसेच अलिंगन देत गुडबाय केले. यावेळी दोघंही आनंदी दिसत होते.