'वीरे दी वेडिंग' फुल्ल टू लेडीज स्पेशल!

बॉलिवूडची बबली गर्ल करिना कपूर झळकणार आहे 'वीरे दी वेडिंग' या नव्या चित्रपटात... विशेष म्हणजे हा चित्रपट नायिकाप्रधान आहे... या चित्रपटात एकही हिरो नाही.

Updated: Jun 21, 2016, 10:28 PM IST
'वीरे दी वेडिंग' फुल्ल टू लेडीज स्पेशल! title=

मुंबई : बॉलिवूडची बबली गर्ल करिना कपूर झळकणार आहे 'वीरे दी वेडिंग' या नव्या चित्रपटात... विशेष म्हणजे हा चित्रपट नायिकाप्रधान आहे... या चित्रपटात एकही हिरो नाही.

'फुल ऑन लेडीज स्पेशल'च्या अंदाजात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिनाच्या मते बॉलिवूडमध्ये असं कुणीही नाही जो या चित्रपटाच्या तोडीस तोड असा लेडीज स्पेशल चित्रपट काढू शकेल.

असा चित्रपट हा कदाचित भारतातला पहिलाच चित्रपट असावा. या चित्रपटात एकूण ४ हिरोईन्स असतील ज्या करिना कपूरच्या लग्नासाठी एकत्र येतात... तेव्हा त्या काय करतात आणि किती धम्माल करतात? याबाबत करिनाला विचारले असता ती म्हणाली की ते तुम्ही बघाच... तुम्हाला खूप मज्जा येईल.

या चित्रपटात करिनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शीखा तलसानिया या चौघी प्रमुख भूमिकेत दिसतील तर एकता कपूर आणि रिआ निर्मात्या असणार आहेत.