विवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार प्लॅट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय देखील जवानांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. विवेकने देशासाठी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यामध्ये २५ फ्लॅट देणार आहे.

Updated: May 13, 2017, 10:25 AM IST
विवेक ओबेरॉय शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार प्लॅट title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर आता विवेक ओबेरॉय देखील जवानांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. विवेकने देशासाठी शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यामध्ये २५ फ्लॅट देणार आहे.

विवेक ओबेरॉयची कंपनी कर्म इंफ्रास्ट्रकचर प्राईव्हेट लिमिटेडकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे. पहिल्यांदाच विवेकने ही मदत केली आहे असं नाही आहे. विवेकने २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीमध्ये देखील मदत केली होती. ज्यासाठी नंतर त्याला अनेक अॅवॉर्ड देखील मिळाले होते. विवेक हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्या अँटी-टोब्बॅकोचा प्रवक्ता देखील आहे. सामाजिक कामांसाठी तो फोर्ब्सच्या यादीमध्ये देखील आला आहे.