शाहिदच्या 'त्या' मेव्हणीचा इन्स्टाग्रामवरून कमबॅक

२००६ ला शाहिद कपूरची विवाह हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फिल्ममध्ये अमृता रावची लहान बहीण म्हणजेच फिल्ममधली 'छोटी' ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती. या 'छोटी'चं खरं नाव आहे अमृता प्रकाश...

Updated: Jun 21, 2016, 11:14 PM IST
शाहिदच्या 'त्या' मेव्हणीचा इन्स्टाग्रामवरून कमबॅक title=

मुंबई : २००६ ला शाहिद कपूरची विवाह हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फिल्ममध्ये अमृता रावची लहान बहीण म्हणजेच फिल्ममधली 'छोटी' ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती. या 'छोटी'चं खरं नाव आहे अमृता प्रकाश...

विवाहमधली ही छोटी मात्र टी.व्हीच्या पडद्यावर एक नामांकीत अँकर आहे. अमृताने 'फॉक्स किड्स' शो सारख्या अनेक शोजचे अँकरिंग केलेय. त्याचप्रमाणे तिने अनेक टीव्ही सीरीयल्समध्ये ही छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.   

फिल्म करिअरमध्ये अमृताला सगळ्यात मोठा ब्रेक तिच्या 'तुम बिन' या सिनेमातील 'मिली' या भूमिकेमुळे मिळाला. हिंदीसोबतच तिने दक्षिण-भारतीय फिल्म्समध्येही काम केलंय.

उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी अमृताने काही काळ अॅक्टींगमधून ब्रेक घेतला. अमृताने मुंबई युनिव्हर्सिटीमधून कॉमर्स आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केलंय.

नुकतंच अमृताने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. दहा वर्षानंतर अमृताचा हा ग्लॅमरस लूक तुम्हालाही नक्की आवडेल.

 

Not a morning person. Just not. #MorningGrumps #DawnOfTheDead #NoFilter

A photo posted by Amrita Prakash (@amrita73) on