मुंबई : नागराज मुंजळे यांनी मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर आणले आहे. त्यांचे तिन्ही सिनेमे हिट ठरलेत. मराठी सिनेमांकडे पुन्हा एकदा प्रेक्षकाला खेचताना थिएटरकडे वळविलेय. नवीन कलाकार घेऊन त्यांच्यात कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनय उतरावयाचा हा नवा फंडाच मुंजळे यांनी दाखवून दिलाय. त्यांचाच सध्या धुमाकूळ घालणारा सिनेमा 'सैराट'. याची मुख्य कलाकार अर्ची म्हणजे रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरुला अभिनेत्री व्हायचेच नाही. तिला समाजाचे देणे फेडायचेय, असे ती सांगते.
१६ डिसेंबर २०१३. याच दिवसी रिंकू नागराज मुंजळे यांचे शुटिंग पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी सहज गेली होती. ही त्यांची पहिली भेट. मात्र, ही पहिली भेट रिंकूला धक्का देणारी ठरली. रिंकूची भेट मागराज यांच्याशी झाली. ती आनंदात होती. मात्र, त्यापुढे तिला धक्काच बसला. चक्क सिनेमात काम करण्याची ऑफरच देण्यात आली. त्यावेळी प्रेरणाला राजगुरुला विश्वासच बसला नाही. त्यानंतर पुढे काहीही हालचाल दिसली नाही. यात वर्ष सरले आणि १६ डिसेंबर २०१४ ला चक्क तिला नागराज यांचा फोन आला, तुझी सिनेमासाठी निवड झालेय म्हणून.
त्यानंतर सिनेमाचे शुटिंग होण्याआधी रिंकू अर्थात प्रेरणाला अभिनयाचे धडे पुण्यात देण्यात सुरुवात झाली. कसं काम करायचे याचे? नवख्या रिंकूला काहीच जमत नव्हते. नागराज यानी तिला विश्वास दिला आणि तिने स्वत:ला झोकून अभिनयाची कोणतीही कसर सोडली नाही. अभिनयात उणीव दाखवून दिली नाही. पडद्यावर 'सैराट'ची मुख्य नायिका दिसली. तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. असे असताना तिला मात्र, अभिनयात रमायचे नाही. तिला वास्तवात डॉक्टर व्हायचे आहे. तसे तिनेच बोलून दाखवले आहे.
डॉक्टर होऊन तिला समाजाची सेवा करायची आहे. तिला पुढचा प्रश्न विचारला असता तिने प्रथम डॉक्टर व्हायलाच आवडेल असे सांगितले. जर दोन्ही भूमिका पार पाडता आल्या तर मी अभिनयही करेन. पण डॉक्टर मस्ट असल्याचे आवर्जुन प्रेरणा राजगुरु हिने सांगितले. सध्या तिने नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेय. तिने ८१.०६ टक्के गुण मिळविलेत. तर पडद्यावर केवळ ५१ टक्केच प्राप्त केलेत.