मक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत. 

PTI | Updated: Sep 30, 2014, 04:05 PM IST
मक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान title=

जेद्दाह: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत. 

78 वर्षीय कादर खान त्यांचे मुलं सरफराज आणि शाहनवाज यांच्यासोबत मक्का इथं गेले. शाहनवाज पण एक अभिनेता आहे आणि त्यांनी 'तेरे नाम' आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी पण आहे. भारतीय हज अधिकारी उमर खान यांनी सांगितलं की, 'कादर खान मक्का इथं येऊन खूप आनंदी आहेत.' त्यांनी सांगितलं की, सध्या मक्काच्या एजिजामध्ये ते थांबले आहेत. 

उमर खान यांनी पुढे सांगितलं की, 'जेव्हा त्यांनी जमजम (पवित्र जल) प्राशन केलं तेव्हा मला आशीर्वाद दिले. त्यांची प्रकृती काही खूप उत्तम नाहीय. ते व्हील चेअरवर आहेत. मात्र हज केल्यानं ते खूप खूश आहेत.'  कादर खान अरेबियन टूर्सहून रविवारी पोहोचले आणि ते 20 दिवस इथं थांबणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.