...आणि 'मुख्यमंत्र्यां'नी आलियाचा पोपट केला!

भारताचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारल्यावर ओरडत 'पृथ्वीराज चौहान' असं ओरडून नंतर मग आपलेच ओठ चावणारी 'जिनिअस' आलिया तुम्हाला आठवतच असेल... त्यामुळे, अनेक जण आता आलियाचा जीके अपडेट असल्याची खातर जमा करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 1, 2014, 07:54 AM IST
...आणि 'मुख्यमंत्र्यां'नी आलियाचा पोपट केला! title=

मुंबई : भारताचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारल्यावर ओरडत 'पृथ्वीराज चौहान' असं ओरडून नंतर मग आपलेच ओठ चावणारी 'जिनिअस' आलिया तुम्हाला आठवतच असेल... त्यामुळे, अनेक जण आता आलियाचा जीके अपडेट असल्याची खातर जमा करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.

एक पत्रकारनंही आलियाचा जीके किती अपडेट पाहण्याचं ठरवलं... आणि मुलाखती दरम्यान आलियाला विचारूनच टाकलं... 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?'

आत्तापर्यंत पत्रकारांच्या असल्या प्रश्नांना सरावलेल्या आलियानं आपल्या चेहऱ्यावर 'काय हे घिसेपिटे प्रश्न विचारताय?' अशा प्रश्नार्थक नजरेनं विचारलं... आणि 'आता तर माझ्या चांगलंच तोंडपाठ झालंय, या प्रश्नाचं  उत्तर' असे हावभाव चेहऱ्यावर आणून मोठ्या आत्मविश्वासानं म्हटलं 'पृथ्वीराज चव्हाण'...

पण, परत एकदा आलियाचा पोपट झाला... आणि 'जिनिअस' आलियाचा जीके तिच्या कपड्यांइतका अपडेट नसल्याचं समोर आलं. 

आलियाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत हे एव्हाना माहीत झालं होतं... पण, त्यांनी नुकताच राजीनामा सोपवलाय याचा मात्र गंधदेखील तिच्यापर्यंत पोहचला नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाणांनी २६ सप्टेंबरलाच आपला राजीनामा सोपवलाय. 

बॉलिवूडची 'जिनिअस' अभिनेत्री आलिया भट्ट हेच पालूपद आता तिच्याकडे केव्हापर्यंत राहणार, देव जाणे... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.