... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Updated: Oct 7, 2015, 11:50 PM IST
... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग title=

मुंबई: बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

मंगळवारी बोरीवली नॅशनल पार्कमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला. यात राज्याचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. व्याघ्रदूत म्हणून निवड झाल्यानंतर बच्चन यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चार तास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत त्यांनी नॅशनल पार्कची सफर केली. तेव्हा एका वाघानं त्यांच्या गाडीचा तब्बल चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.

सफरीनंतर आयोजित कार्यक्रमात हा किस्सा सांगत बच्चन म्हणाले की, मुंबईतील माझ्या ४५ वर्षांच्या वास्तव्यात प्रथमच मी इथं भेट दिलीय. इथला वन्यजीवन आणि परिसर मी पहिल्यांदा पहिला याचं मला दु:ख असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी बिग बी यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या गाजलेल्या 'अग्निपथ' मधील काव्यपंक्ती सादर केल्या. तसंच व्याघ्र संवर्धनासाठी आपण शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही बच्चन यांनी या वेळी सांगितलं. 

आणखी वाचा - अमिताभ राज्याचे 'टायगर अॅम्बेसिडर'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.