मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
हर्नियाच्या ऑपरेशनसाठी सलीम खान यांनी मुंबईतल्या लीलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय, अशी माहिती सलीम खान यांच्या कुटुंबीयांनी दिलीय.
अधिक वाचा - नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल
79 वर्षीय सलीम खान यांच्यावर लवकरच हर्नियाचं ऑपरेशन करण्यात येणार आहे. सलीम खान हे सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांचे वडील आहेत.
सलीम - जावेद या लेखक जोडगोळीनं अनेक सुपरहिट सिनेमांसाठी लिखाण केलंय. शोले, जंजीर, हाथी मेरे साथी, त्रिशूल यांसारख्या चित्रपटांचं लिखाण त्यांनी केलंय.
सलमा खान आणि अभिनेत्री हेलन या सलीम खान यांच्या दोन पत्नी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.