Oooo.. ‘या’ मित्राने सोडली शाहरुखची साथ

 बॉलीवूड किंग खानच्या ‘रईस’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझरही लाँच झाला असून नेटकऱ्यांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट माहीत आहे का?

Updated: Nov 20, 2015, 01:15 PM IST
Oooo.. ‘या’ मित्राने सोडली शाहरुखची साथ title=

मुंबई : बॉलीवूड किंग खानच्या रईस चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझरही लाँच झाला असून नेटकऱ्यांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट माहीत आहे का?

या चित्रपटात याआधी शाहरुखसह फरहान अख्तर काम करणार होता. चित्रपटाच्या एक दोन पोस्टर्समध्येही फरहान दिसला होता. मात्र त्यानंतर त्याने चित्रपट सोडून दिला. या चित्रपटात फरहान पोलिसांच्या भूमिकेत दिसणार होता. आता ही भूमिका गुणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी करणार आहे. नवाजुद्दीन या भूमिकेला पूर्ण न्याय देईल यात शंकाच नाही.

राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ या चित्रपटाती निर्मिती फरहान अख्तर करत आहे. त्यामुळे त्याने हा चित्रपट सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकताच ‘वजीर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या लाँचिंगदरम्यान 'रईस' चित्रपट सोडण्याचे कारण फरहानने सांगितले.

'वजीर'मध्ये फरहान पोलिसांची भूमिका साकारत आहे आणि ‘रईस’मध्येही त्याच प्रकारची भूमिका असल्याने त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच सारखी भूमिका केल्याने चित्रपटाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.