'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कलाकाराला अपघात

स्टार प्लस या वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध मालिकेतील एका कलाकाराला अपघात झालाय. या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी निधी उत्तम हिला अपघात झालाय.

Updated: Jul 8, 2016, 11:06 AM IST
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कलाकाराला अपघात title=

मुंबई : स्टार प्लस या वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध मालिकेतील एका कलाकाराला अपघात झालाय. या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी निधी उत्तम हिला अपघात झालाय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मंगळवारी हा अपघात झाला. यावेळी निधी शूट करुन घरी परतत होती. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला तिच्या कारची धडक बसली. 

दरम्यान, या अपघातातून निधी बचावली असून तिला किरकोळ दुखापती झाल्यात. काही दिवसांपूर्वी याच मालिकेतील हिना खानच्या सासूची भूमिका करणारी क्षित जोग हिची कार चोरीला गेली होती. गोरेगाव स्थित घराच्या जवळ तिने कार पार्क केली होती. मात्र जेव्हा दुसऱ्या दिवशी ती शूटसाठी निघाली असताना कार चोरीला गेल्याचे तिने पाहिले.