www.24taas.com, मुंबई
आपलं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असावं अशी प्रत्येक पुरूषाची भावना असते. मात्र काही कारणास्तव या अनेक वेळेस अनेकजण सुखी आणि जीवन जगण्यासाठी झगडत असतात.
त्यामुळे अशा पुरूषांमध्ये नैराश्य येते. मात्र अशा गोष्टीवर नक्कीच मात करता येते. त्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनात सुखी समाधानी ही राहू शकता... उपचार केल्यास तुमच्यातील कमजोरी नष्ट होईल.
-आयुर्वेदात खडीसाखरचे पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी असे महत्व सांगितले गेले आहे.
- स्वप्नदोषाची समस्या असल्यास, डाळींबाचे छिलके वाळवून त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.
- केळ पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. त्यामुळे दररोज एक केळ खावे.
- दररोज रात्री ग्लासभर पाण्यात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर या पाण्यात हळद टाकावी आणि गाळून ते पाणी प्यावे.
- नियमित लसूण खाल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शारीरिक कमजोरी असणाऱ्या पुरुषांनी दररोज संध्याकाळी लसणाच्या दोन कुड्या खाव्यात. त्यानंतर पाणी प्यावे.